अखंड राहो ..
डागाळलो गेलो मी
जरी सत्शील चरित्र
गद्दार हुद्दा लादलेला
अंतरात्मा तो पवित्र
उर्जा अखंडीत दिली
बनलो सक्षम जनित्र
संपूर्णपिढ्या पक्षात
सांगती महिमा पित्र
जी हुजूर घोळक्यात
वाईट ठरतोयं मित्र
तुमची झोळी भराया
घेऊनि फिरलो पात्र
तिकीट वाटप करता
ठरलो आधी अपात्र
अरे उचला सतरंज्या
मुख दुर्बळा मेषपात्र
भजन गात बसलोयं
रे जोरात दिवस रात्र
बाहेरून आले त्यांना
दिले चामर कृपाछत्र
दिले अख्खे आयुष्य
घ्या सादर शपथ पत्र
अखंडीत राहो घर हे
मनोमन वाटते मात्र
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
Users Today : 9