सूत्र बंधन..
मनगटी सूत्र बांधले
फोटो सर्वत्र लावले
एकनिष्ठा अशीहवी
सकला कसे भावले
भित्तीचित्रे होर्डिंग्ज्
सगळीकडेचं ठेवले
पक्ष स्नेह नंदा दीप
मनामनात रे तेवले
पक्षास्तव घाम गळे
भाग्यआम्हां घावले
वेळ आली खुर्चीची
नेमके मला डावले
भांडणात दोघांच्या
तिस-याचेचं फावले
बाहेर जाणार पळून
म्हणूनि दार लावले
विश्वास आपल्यावर
वाटले देवचं पावले
न कळे काय बिनसे
उलटी पडली पावले
विश्वासू म्हणे ज्याला
कुत्रेचं कडाड चावले
तरी बोले परत यावे
हे रूपआपले भावले
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
Users Today : 9