मुहूर्त..
यंदास मुहूर्त भरपूर
जोमात लग्न सराई
आनंदोत्सव साजरा
आपली केली पराई
नवी सोयरीक जुळे
घरोघर स्वागत होई
वाट पाहिली बरीचं
सूनसोनपाऊले येई
खुशीत कितीसोयरे
परिवार दिलजमाई
सासू सासरे रे हसरे
मिळाले भलेजमाई
लटके देईलं झटके
रुसून बसते वरमाई
कलाकार उत्साहात
सुरे मंगलाष्टक गाई
लग्नास हजेरी लावू
व-हाडा वेगळी घाई
धावाधाव पळापळ
लागे लग्ने ठाई ठाई
सजूनधजून बाराती
नाचत गाजत जाई
भोजनभाऊ खुशीत
सुग्रास तुडूंब खाई
किती दिसांनी हसून
द्यायला मिळे बधाई
डोळ्या आले आसवे
देता लेकरांस बिदाई
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996.
Users Today : 9