डाॅक्टर बाबासाहेब ..
महामानवा दिलीस
धग धगती मशाल
प्रवाहां विरूद्ध जा
शिकवले तू खुशाल
सुखी होण्यास रयत
कृषक हो खुशहाल
दीन दुर्बल पाठीवर
तुझ्या मायेची शाल
घालून दिले सन्मार्ग
संविधान ते बहाल
निळा सूर्य उगवता
उर्जा रूपात पहाल
कामगार बंधुकरिता
कार्य आपले कमाल
चारघास खाई आज
असंघटीत रे हमाल
वाचनसंस्कृती वृध्दी
ज्ञानचं तलवार ढाल
शिक्षीत जनता सारी
उधळा निळा गुलाल
चवदार तळ्या दिसे
रुप तेजस्वी जहाल
दुवा देतात महिला
उठवला तुचं सवाल
राज्यघटना पायावर
उभा सक्षम महाल
आठवात जागरूक
डाॅक्टर सालो साल
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
Users Today : 9