भारत तालिम संघ,मेहकर पैलवानांचा झंझावात..

Khozmaster
5 Min Read

विनम्र अभिवादन 

स्व.पै.ज्ञानबाभाऊ जाधव

स्व.पै.सितारामभाऊ सावळे

स्व.पै.प्रफुल्लभाऊ परदेशी

 

आमचे आधारस्तंभ 

गुरुवर्य श्री.देवदत्त महाराज पितळे

अध्यक्ष श्री.बबनभाऊ भोसले

उपाध्यक्ष श्री.अर्जुनभाऊ मिरे

सचिव श्री अनंथाभाऊ नवाडे

 

विश्ववंदनिय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज,छञपती संभाजी महाराज यांच्या महान अश्या कार्याने प्रेरित होऊन तसेच छत्रपती शाहू महाराजांनी मर्दानी खेळासाठी तालीमा उभारत जगाला कुस्ती,बल्लखांब सारख्या मर्दानी खेळानां राष्ट्रीय दर्जा देत ओळख निर्माण करुन दिली संपुर्ण देशात,महाराष्ट्रत सुरू झाल्यालेल्या या प्रवासात श्री शारंग्धर नगरीत मेहकर येथील सर्व समावेशक समधर्मसभावाचे प्रतिक म्हणुन ओळखल्या जाणारा श्री भारत तालिम संघाने खुप मोठी मुसंडी मारली.

 

इंग्रज कालीन असलेला श्री भारत तालिम संघाच्या निर्मिती ते आज पर्यतं अनेक जेष्ठ मान्यवर श्री.देवदत्त महाराज पितळे, स्व.पै. ज्ञानबाभाऊ जाधव, स्व.पै.सितारामजी सावळे, स्व.पै.प्रफुल्लभाऊ परदेशी, मा.श्री.बबनरावजी भोसले, श्री.पै.अर्जुनभाऊ मिरे,श्री.पै.अनंताभाऊ नवाडे पै.गजाननभाऊभवर पै.कुळकर्णी, पै.प्रभु खवसे, पै.नारायण,पै.सुभाषभाऊ खंडागळे,पै.रामभाऊ कानफाडे, स्व.आनिल भाऊ पांडे ,दिलीप भाऊ बनचरे, शाम पिंपळकर राजु बनचरे ,असे अनेक सन्माणिय सदस्याच्या मेहनतीने उभा असेलेल्या आखाड्याच्या माध्यमातुन अनेक सदस्यानी कलर कोट पटकावला त्यामधे पै.श्रीरंग मोरे,पै.अस्लम गलळी,पै.संदिप खोटे,पै.रोशन पाठक, पै.अशोक दिक्षीत(हाॅलीबाॅल कलर कोट) पै.सारंग परदेशी बुलढाणा जिल्ह्यात पहीला NIS कुस्ती कोच होते.

 

तर महाराष्ट्र कुस्तीगिर परीषद ज्यांनी दहा वर्ष प्रतिनिधीत्व केले असे कुस्तीतुन डबल कलर कोट मिळवणारे स्व.पै.ज्ञानबाभाऊ जाधव यांनी त्या काळी बुलढाणा जिल्ह्यातुन एक नंबर असलेले पै.मुजफर मास्टर ज्याना अयुष्यात कधि ही कुस्ती हरली नाही अश्या नौवलौकीक पैहलावाना सोबत दब्बल एक तास कुस्ती खेळुन चित केले त्या काळी त्यांची खामगाव मधे मिरवनुक काढण्यात आली होती. त्यांनी कुस्तीच्या माध्यमातुन डब्बल कलर कोट मिळवला यांच्या माध्यमातुन,मार्गदर्शनातुन आज तिस ते पसतीस पैहलवान पोलीस,आर्मीत व इतर नौकरी रुजु झालीत असे अनेक सामाजिक कार्यक्रम,श्री गणपती च्या मिरवणुकीत दरवर्षी मल्ल आपली कर्तबगारी दाखवत सार्याय जणतेची मने जिंकत असतात

 

आजच्या आधुनिक युगात नवनवित मशनरी निघत अनेक जिम अस्तित्वात आले अनेक युवक जिमकडे आकर्शित झालीत व होत राज्यातील अनेक आखाड्यांचे अस्तित्व धोक्यात असतांनी सुध्दा श्री भारत तालिम संघ अतिशय शक्तीने चालु असतांनीच आखाड्यावर १ नोव्हेबंर२०२० रोजी काळाने घाला घातला शाॅर्ट सर्कीटने जळुन खाक झाला सर्व काही नाहिस झाले होते परंतु मनाची व शरीराची शक्ती अनेकांना देणारा तालिम संघ जसे की भारतावर संकट आल्यावर आर्मी ज्या प्रमाणे संकटावर मात करते त्याचप्रमाणे तालिम मधे तयार झालेले अनेक पैहलवान आर्मी मधे भरती झाल्यापैकी एक पै.अनिलभाऊ काटकर हे समोर आले आणि त्यांच्या सोबत पै.सचिनभाऊ चुनडे,पै.मोहनभाऊ जाधव व सर्व सदस्यांनी परत ऐकदा आपली आर्थिक परिस्थीती कमजोर असतांनी.

 

सुध्दा स्व:ताच आर्थिक साय्यता निर्मीण करुन आपल्या सदस्या पैकी अनेक सदस्य कारागीर,कामगार,वेल्डर,मिस्तरी असल्याने स्व:ता पुर्ण आखाडा बांधुन नविन निर्माण केला सर्व काही एक एक वस्तु जमा केल्या आज अतिशय सुंदर अशी वास्तु ज्याला बघीतल्यावर जुन्या मातंबर आखाड्यांची आठवण येईल आज परिस्थीती जैसे थी झाली छोट्या मोठ्या पैहलवान मंडळीच्या सहकार्याने घामाने परत तिच तालिम नव्याने जोमाने सुरु झाली हे सर्व बघुन नविन पिढी आकर्शित होत शेकडोच्या संखेने कसरत करत आहे त्यातच छोट्या मुलांची हजेरी बंघुन कुतूहल निर्मिण होत आहे मेहकर चे मा. नगर अध्यक्ष संजुभाऊ जाधवांचा मुलगा पै.संग्राम जाधव,न प चे अधिकारी संतोष राणे साहेबांचा सुध्दा मुलगा आखाड्यात कसरत करतांनी दिसत आहे अनेक मान्यवराचे गौरगरीबांचे ते अधिकार्यांाचे मोठ्या थोरांचे सर्व पैहलवान अतिशय संगणमताने येथे जेष्ठ मंडळींच्या सानिध्यात प्रशिक्षण घेत आहेत.

 

या ठिकाणी छ.शाहु महाराजांच्या शिकवणीतुन व डाॅ बाबासाहेबांच्या लेखनीचे अनुकरण करुन सर्व जातीधर्माच्या लोकांनी ऐकञ येत श्री भारत तालिमच्या माध्यमातुन नित्य नियमाने व्यायामाने आपल्या शरिराला कसवत कुस्त्या,बल्लखांब,ढोल लैझीम सारख्या खेळात राज्यस्तरावर आपली योग्यता निर्मीण करत आज कित्तेक सदस्य शासकिय सेवेत रुज झालीत मोठ्या धिकांना सन्मानाने तर छोट्यांना अधिकाराने वागवत अतिशय मोलाची कामगिरी करणारे सर्व सन्माणिय सदस्यानीं अनेक क्षेञात आपले पाय रोवत यशाची कास धरली आहे या ठीकाणी आपण ही आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व शारीरीक शौर्यासाठी तालिमच महत्व सांगून तालिम सोडण्यास सांगाव येथे कोणत्याही शुल्क आकारत नाही हे सर्व कार्य पाहुन समाजातील तळागातील लोक राजकीय नेते मंडळी नेहमी शुभेच्छाचा व अभिनंदनाचा वर्षाव नेहमी करत असतात.

माहिती संकलन

पै.गोपाल भ.जाधव

सदस्य भारत तालिम संघ मेहकर*

 

शब्दाकंन

प्रल्हाद मा.भिसे

सामाजीक कार्यकर्ता मेहकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *