पोलीस स्टेशन अंतर्गत पातुर बाळापूर मार्गावरील भुयारा लगत तुळजापूर रस्त्यावरील लिंबाच्या झाडाला अब्दुल वाजिद अब्दुल रशीद व 27राहणार मुजावर पुरा पातुर या युवकांने 3 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली . याप्रकरणी पातूर पोलिसांनी 49/22 नुसार मर्ग दाखल केला आहे.पातुर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुजावर पुरा येथील अब्दुल वाजिद अब्दुल रशीद वय 27 वर्ष यांची कैफियत मृतकाचे मामा जब्बारखान रूमखान व 37 राहणार मुजावर पुरा पातुर यांनी 3 डिसेंबर रोजी सदर तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पातुर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानंतर नातेवाईक व पोलिसांनी शोधा शोध केल्यानंतर सदर युवकाने भुयारा लगत तुळजापूर रस्त्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.4 डिसेंबर रोजी अकोला येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.
सदर घटनेचा पंचनामा पातुर पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन पोटे व पोलीस कर्मचारी यांनी केला आहे.पातूर पोलिसांनी 49/22 नुसार मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.
Users Today : 6