दोन आरोपी विरुद्ध पातूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
योगेश नागोलकार पातूर

शहरातील डाक बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या माजी नगराध्यक्ष काँग्रेस गटनेते तथा सदन कास्तकार सय्यद बुरहाण सय्यद नबी यांच्या गोडाऊन मधून सोयाबीन दोन क्विंटल किंमत सात हजार रुपये सोयाबीनचे कट्टे दोन आरोपी चोरून घेऊन जात असताना फिर्यादीस दिसून आल्याने व त्यांचा पाठलाग केला असता पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन पैकी एका आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले. व एक आरोपी फरार झाला. याप्रकरणी पातुर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सय्यद जुबेर सय्यद अन्सार वय 40 वर्ष राहणार मुजावर पुरा पातुर सय्यद इर्शाद सय्यद अय्युब वय 40 राहणार मुजावर पुरा पातुर या दोघांविरुद्ध पातुर पोलिसांनी अपराध नंबर 392/22 कलम 380 461 अधिक 34 भादवी नुसार4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद बुरहाण सय्यद नबी यांच्या तक्रारीवरून आरोपी सय्यद जुबेर सय्यद अन्सार 40 वर्ष राहणार मुजावर पुरा पातुर व सय्यद इर्शाद सय्यद अय्युब दोघे ही राहणार मुजावर पुरा पातुर हे फिर्यादी यांच्या गोडाऊन मधून सोयाबीन अंदाजे दोन क्विंटल किंमत सात हजार रुपये किमतीचे सोयाबीनचे कट्टे दोनही आरोपी चोरून घेऊन जात असताना फिर्यादि सय्यद बुरहान सय्यद नबी हे आपल्या गोडाऊन वर चक्कर मारण्यासाठी गेले असता 4डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान दोन चोरटे सोयाबीनची चोरी करताना दिसून आल्याने चोरट्यानीं फिर्यादीस पाहून पळ काढला मात्र फिर्यादीने आरोपीचा पाठलाग केला असता पळून जाण्याऱ्या दोन पैकी एका आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले.
याप्रकरणी पातुर पोलिसानी दोघांविरुद्ध फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अपराध नंबर 392/22 कलम 380 461 अधिक 34 भादवी नुसार4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.पातुर पोलिसांनी सय्यद जुबेर सय्यद अन्सार वय 40 राहणार मुजावर पुरा पातुर याला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर भोंगे करीत आहे.
Users Today : 39