ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, एकपात्री प्रयोग भरगच्च कार्यक्रम

KHOZ MASTER
3 Min Read
अकोला
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि. १० आणि रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी,परिसंवाद,व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची  साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशीमाहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे.
सविस्तर कार्यक्रम पत्रिका या प्रमाणे- या ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि. १० रोजी सकाळी १२ वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास….जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ, खासदार ॲड. संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरण सरनाईक,  आ. वसंत खंडेलवाल,  विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अमरावती अरविंद ढोणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड गजानन पुंडकर, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. आशिष राऊत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ, डॉ. संजय तिडके व ग्रंथमित्र एस.
आर.बाहेती आदी उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन सत्रानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वा. ‘संगणकीय युगात ग्रंथाचे स्थान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून ज्येष्ठ साहित्यिक मधुभाऊ जाधव, ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. स्वाती दामोदरे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा थोरात आणि विदर्भ साहित्य संघाच्या (अकोला) सचिव सीमा रोठे यांचा सहभाग असणार आहे तर चंद्रकांत चांगदे परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. याच दिवशी सायंकाळी नितीन शेगोकार  यांच्या ‘छु लो आसमान’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.दुसऱ्या दिवशी  रविवार दि. ११ रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ वा. ‘ग्रंथाने मला काय दिले’ विषयावर परिसंवाद होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे या परिसंवादाच्या अध्यस्थानी असतील तर  महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र यांचा सहभाग असेल  राम मुळे या परिसंवादाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतील. त्यानंतर दुपारी दोन वा. ‘अडम धडम’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख हे राहतील तर धीरज चावरे, प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे हे सहभागी होतील.त्यानंतर अकोट येथील हर्षदा इंदाने ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना अकोल्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे. ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.
0 9 7 2 0 8
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *