विषय – डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी – उमेश इंगळे 

Khozmaster
2 Min Read
अकोला प्रती – अंत्यंत गरिब कुटुंबातील हात मजुरीवर काम करणाऱ्या उमेश चव्हाण या व्यक्तींच्या पत्नीचे सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे दि .१४/०३/२०२० रोजी आयुर्वेद रुग्णालय व अनुसंधान केंद्र अकोला येथे डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या हस्ते कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली होती परंतु हे शस्त्रक्रिया अपयशी झाली असुन या महीलेला दोन महिन्यांचे दिवस गेले आहेत संबंधित *डॉ श्यामकुमार सिरसाम यांना विचारणा केली असता ते म्हणाले शस्त्रक्रिया अपयशी झाली तर मी काय करू* असे उद्धटपणे उत्तर दिले सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे दोन वेळा सिझर झाले असुन आता तिच्या जिवाला धोका आहे म्हणून अश्या कामचुकार, रुग्णांशी उद्धटपणे वागणाऱ्या बोगस डॉक्टर विरूद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवण्यात यावा  आम्ही संबंधित डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन,मा.तानाजी सांवत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये, जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी अकोला यांच्या कडे तक्रार केली.संबधित बोगस डॉक्टर विरूद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी व रुग्णांला होणारा *शारीरिक, मनससिक, आर्थिक, त्रास भरून देण्यात यावा* नाही तर आम्ही आंदोलन करु या करीता निवेदन दिले होते.पत्रकार परिषद घेऊन डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु संबंधित डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी नाही कीवां रुग्णांना या बाबतीत माहिती दिली नाही त्या गरोदर महीलेचे दिवस वाढत आहेत व सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये व वरिष्ठ अधिकारी निष्काळजीपणा करत आहेत म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी, रुग्णसेवक संघटनेचे जिल्हा महासचिव समिर खान, चंद्रविर तेलगोटे सामाजिक कार्यकर्ता, नितेश खंडारे, विनोद खंडारे, गजानन जाधव, सुभाष पवार, आकाश जाधव,श्रिकांत गवई,आदी पदाधिकारी उपस्थित होते
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *