अकोला
राज्यात 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ 6 डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे झाले आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात समता पर्वांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबीर, वकृत्व, चित्रकला व गायन स्पर्धा, मार्गदर्शन कार्यशाळा, वसतीगृहात सामुहिक स्वच्छता इत्यादी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी दिली.
Users Today : 37