जि.प.व.प्रा. शाळा कार्ला बु. येथे वाॅटर फिल्टर अँड कुलिंग मशीनचा उद्घाटन सोहळा संपन्न..

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बालमनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे .कारण आजच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,
शिक्षक हे सतत विद्या दानाचे कार्य करित असतात पण पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन शिक्षकांशी समन्वय साधुन आपल्या पाल्याच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे,आपली पाल्यचं आपली खरी संपत्ती आहेत, असे प्रतिपादन जि प सदस्य श्री गजाननराव काकड यांनी जि प व प्रा शाळा कार्ला बु येथील वाॅटर फिल्टर अँड कुलिंग मशीनच्या उद्घाटन व विद्यार्थी अर्पण सोहळ्यात केले.सर्वप्रथम दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,वाॅटर फिल्टर अँड कुलिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले, वचनपूर्ती केल्याबद्दल जि. प.सदस्य श्री. गजाननराव काकड यांचा पुष्पहार, शाल,फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला
कार्ला येथिल विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी पिण्यास मिळावे यासाठी गजाननराव काकड यांनी त्यांच्या विशेष निधीतून हे उपकरण शाळेला दिले
सुजान नागरिक घडवणे ही शाळेची मुख्य जबाबदारी आहे,भौतिक सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नाही असे याप्रसंगी ते बोलले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य. समिती अध्यक्ष सौ.सुनिता खंडेराव, उद्घाटक श्री.गजाननभाऊ काकड, प्रमुख अतिथी सरपंच श्री. नंदलालजी भराटे, उपसरपंच सौ.माधुरीताई सपकाळ,सदस्य सौ. राधाताई पेठे,श्री. रामेश्वरजी झटाले, श्री.अजयभाऊ बोदडे,शा. व्य. समिती उपाध्यक्ष श्री गोपालभाऊ चांदुरकार, शिक्षणतज्ञ श्री संतोषभाऊ भराटे ,केंद्र प्रमुख श्री मनीषदादा गि-हे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सहायक अध्यापक उमेश तिडके  सूत्रसंचालन संजय राठी तर आभार प्रदर्शन दिनेश शेंगोकार यांनी केले.उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सौ सरोज टिलावत मॅडम यांच्या नेतृत्वात सहायक अध्यापक श्री संदिप जाधव , कु  सविता धानोरकर, कु विजया खंडारे व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले
विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *