प्रतिनिधी रामेश्वर वाढी
दिनांक 9 सप्टेंबर रोजी पातूर शहरात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या थाटात पार पडले,या निमित्ताने श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेने आपल्या नावलौकिका प्रमाणे महाराष्ट्राची लोकप्रिय कला जोपासतांना भव्य आखाडा प्रदर्शन सादर केले.या मध्ये लेझिम, दांडपठ्ठा,लाठीकाठी,भवरा, या सारखे अनेक साहसी खेळाचे सादरीकरण केले.आखाड्यामध्ये अगदी लहान मुलानं पासन सर्व तरुण वर्गाने अंत्यत साहशी खेळाचे प्रदर्शन केले.हा कार्यक्रम सुनियोजित पणे पार पाडण्याची जबाबदारी श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे श्री मंगेश गाडगे(बजरंगी),मार्गदर्शक चंदू वस्ताद,पै. सुरेश श्रीनाथ,निलेश गाडगे कैलास उगले,प्रमोद हाडके,गोपाल निमकंडे, स्वप्नील परमाळे,पवन तायडे,अक्षय तायडे,महेंद्र फलके,सतीश वानखडे बाळा पाटील अंकित निखाडे प्रमोद श्रीनाथ मंगेश माहुलीकर अजय गाडगे करण गहिलोत सुरज क्षीरसागर मंगेश गाडगे मित्र परिवार बजरंगी यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 8