करीरूपागड येथे कृषी विभागाने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

Khozmaster
1 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील करी रूपगड या शिवारात पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून तालुका कृषि अधिकारी तेल्हारा मार्फत वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आले.यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ओढे,नाले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहते पाणी उपलब्ध आहे. पिकांना संरक्षित पाणी देण्याकरिता व  पाण्याचे संधारण होऊन भूजल पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत  वनराई बंधाऱ्याचे काम मोहिम स्वरूपात करण्यात येत आहे.यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड, माळी कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक राजनकर,कोरडे,पेठे,इंगळे,बिहाडे,मेघ,मेरठ,सरनाईक तसेच समुह सहाय्यक लादे,लाहे,तायडे,अघडते व शेतकरी श्री.लोटन भारसाकडे पोलीस पाटील,नजरू पालवे गणेश जांभुळकर यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *