गोर्धा येथे रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवड

Khozmaster
1 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिध
मौजे गोर्धा येथे हरभरा पिकाची  रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करण्यात आली असून सदर पीक हे आता वाढीच्या अवस्थेत आहे.शेतकरी श्री.निलेश बाबुराव देशमुख यांनी मागील वर्षात कृषि विभाग तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड केली होती.त्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळाले.यामुळेच त्यांच्यासमवेत तालुक्यात बिबिएफ पद्धतीने लागवड वाढते आहे.यावेळी सदर प्लॉटची पाहणी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड,कृषि पर्यवेक्षक श्री नागे कृषि सहाय्यक महेश इंगळे यांनी केली.बीबीएफ पद्धतीने बियाण्याची बचत होते.पाऊसाचे जास्त पाणी शेतात साचून राहत नाही.फवारणी व सिंचन करणे सोयीचे होते.सोबतच सूर्यप्रकाश मिळतो व हवा खेळती राहते.त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *