दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी. कॅडेट तेजस डांगे याने सरदार वल्लभभाई पटेल ट्रेकिंग कॅम्प, गुजरात येथे तर जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी हिने रॉक क्लाइंबिंग एंड ट्रेकिंग कॅम्प, ग्वालियर मध्ये उत्कृष्ठ असे सुयश प्राप्त केले. श्रीमती एल. आर. टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके आणि एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या मार्गदर्शनात या दोघांनी ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे प्रतिनिधित्व केले. सरदार वल्लभभाई पटेल ट्रेकिंग कॅम्प हा वडोदरा येथे २९ नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर पर्यंत चालला. या कॅम्प मध्ये कॅडेट तेजस डांगे याने स्टैच्यू ऑफ यूनिटी, कर्जत डॅम, सूंडपुरा व जूनाराज या सर्व ठिकानी भेट देऊन वडोदराच्या एतिहासिक स्थळावर ट्रैकिंग केली. या कॅम्प मध्ये त्याला कॅम्प बॅज आणि प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. तसेच रॉक क्लाइंबिंग एंड ट्रेकिंग हा कॅम्प ०२ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत ग्वालियर येथे झाला असून, रॉक क्लाइंबिंग ही किया ग्वालियर किल्ल्यावर करण्यात आली. या कॅम्प मध्ये जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी हिने महाराष्ट्र डायरेक्टरेट ची सीनियर म्हणून भुमिका बजावली. तसेच मिनल रेड्डी हिला कॅम्प कमांडेंट जे. जे. अब्राहम यांच्या हस्ते आर. सी. टी. सी. कॅम्प बॅच आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ब्रिगेडियर राजीव कुमार यांच्या हस्ते महाराष्ट्र डायरेक्टरेट रॉक क्लाइंबिंग रनर अप ट्रॉफी देऊन तिला सम्मानित करण्यात आले. या कॅम्प मध्ये कॅडेट्स ला ग्वालियर किल्ला, मोती महल, तिघरा डॅम, आग्राचे ताजमहल आणि इतर ग्वालियर चे एतिहासिक स्थळे दाखवण्यात आलीत. दोन्ही कॅडेट्स च्या कामगिरी व सुयशाबद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
Users Today : 35