अकोला (भुषण महाजन)
उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे मोटार वाहन तपासणी, वाहन चालक, अनुज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर लावले जाते. जानेवारी ते जुन 2023 या कालावधीसाठी शिबिरांचे नियोजन कळविण्यात आले आहे. त्यानुसार येणाऱ्या नविन वर्षामध्ये जानेवारी 2023 महिन्यामध्ये बाळापूर येथे दि. 3 व दि. 16, मुर्तिजापूर येथे दि. 5 व दि. 19, अकोट येथे दि.9 व दि.23, तेल्हारा येथे दि.11 व दि.18, पातुर येथे दि.13 व दि.25 व बार्शिटाकळी येथे दि.17 व दि.30 शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये बाळापूर येथे दि. 2 व दि. 13, मुर्तिजापूर येथे दि. 6 व दि. 17, अकोट येथे दि.8 व दि.24, तेल्हारा येथे दि.15 व दि.22, पातुर येथे दि.10 व दि.27 व बार्शिटाकळी येथे दि.3 व दि.20 याचप्रमाणे मार्च 2023 मध्ये बाळापूर येथे दि. 2 व दि. 13, मुर्तिजापूर येथे दि. 6 व दि. 20, अकोट येथे दि.8 व दि.23, तेल्हारा येथे दि.10 व दि.27, पातुर येथे दि.3 व दि.16, बार्शिटाकळी व दि.15 व दि.29 अशा नियोजनाप्रमाणे वाहन मालक व चालक यांनी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेण्याबाबत चे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.
Users Today : 35