(भुषण महाजन)
जागतिक मानवाधिकार निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांच्या पावन भूमीत राळेगणसिद्धी येथे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.संस्थापक अध्यक्ष ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ. दीपेश पष्टे यांनी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर आप्पा जाधव व तसेच आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हा भूषण पुरस्कार प्रा.राजकन्या खनखने यांना प्रदान करण्यात आला.
प्रा.राजकन्या खनखने ह्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळी मध्ये अग्रेसर असतात. त्यांनी कोरोना काळात ही सामाजिक कार्य करून आपला ठसा उमटवला आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून आपले कार्य ते करत असतात .
भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने प्रा.एल डी सरोदे, ज्येष्ठ पत्रकार समाधान इंगळे, कवी,युवा कार्यकर्ते अनिल डाहेलकर व गझलकार मिलिंद इंगळे यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष रित्या भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.
Users Today : 35