प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर
रिधोरा ग्रामपंचायत तालुका बाळापूर येथे
रोज गुरुवार रोजी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते त्या चाचणी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून पातुर येथील हनुमान व्यायाम शाळेचा पहेलवान शिव संजय यादव याने ९२ किलो वजन गटातून मातीतील कुस्तीत त्याच्या प्रतिस्पर्धी याला चीत करून त्याच्यावर विजय मिळविला तो आता विभागीय स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथील प्रणांगणात शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये ५७ किलो वजन गटातून हनुमान व्यायाम शाळा पातूर चा पहेलवान पृथ्वीराज संजय यादव यांनी विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली विशेष म्हणजे दोन्हीही पहेलवान सख्खे भाऊ असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील गुरुवर्य व पातूर शहरातील पहेलवान मित्र मंडळी यांना देतात.
Users Today : 35