गॅन्ट्री उभारणीसाठी समृद्धी महामार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद बुलढाणा-वाशीम जिल्ह्यात ३५ टप्प्यांत काम; ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ४५ ते ६० मिनिटांचा ब्लॉक
बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी) :समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील…
ई-केवायसी पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर : नाराजीचा सूर ६८ हजार अपात्र ‘लाडक्या बहिणी’ पुन्हा अडचणीत, लाभ सुरू होण्यास विलंब शक्य
बुलढाणा, दि. ३ : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने बुलढाणा…
जिल्हा परिषद शालेय क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ परिश्रम व आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : प्रथमेश जावकर
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच यश संपादन करू शकतात, असा विश्वास धनुर्विद्येतील…
भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूपाचा शोध घेणारे प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा ६ फेब्रुवारीला बुलढाण्यात नागरी सत्कार
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन गावात २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी विकसित केलेल्या प्राचीन शहर व बौद्ध स्तूपाचे उत्खनन करून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक…
कामगार-कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभागी व्हावे : गायकवाड
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)भांडवलधार्जिण्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय स्तरावर सीटूसह विविध प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपात बुलढाणा जिल्ह्यातील कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने…
राधेश्याम चांडक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप व रणरागिणी क्लबतर्फे आयोजन
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप बुलढाणा व रणरागिणी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध…
वीज बिल थकवले; ६ हजारांहून अधिक कनेक्शन कट बुलढाण्यात सर्वाधिक ४,३५२ ग्राहकांची वीज कापली
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)वारंवार सूचना व आवाहन करूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कठोर पावले उचलली असून, जानेवारी महिन्यात अकोला परिमंडळातील तब्बल ६ हजार ३८७ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात…
निसर्गाच्या सानिध्यात राहाणे काळाची गरज : आ. संजय गायकवाड बुलढाणा जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन उत्साहात
बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –आजच्या डिजिटल युगात मोबाईलपासून काही काळ दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणे, स्वावलंबनाचे धडे गिरवणे आणि जीवनकौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार…
महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे : प्रतिभा भुतेकर चर्मकार समाजाचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न
बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –अंधश्रद्धा स्त्रियांच्या जीवनात खोलवर भिनलेली असून त्यामुळे त्यांच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत. आधुनिकतेची कास धरत महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे…
पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार परप्रांतीय मजुराला मलकापूर रेल्वे स्थानकावर अटक
बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी…
