स्पार्क फाउंडेशन यांच्या सहकार्याने बिरसामुंडा सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न …

Khozmaster
1 Min Read
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी 
आज स्पार्क फाउंडेशन यांच्या वतीने भव्य बिरसामुंडा सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी श्री प्रदीप वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी सांगितले की सभागृहाचा वापर करून सर्वांनी कला गुणांना जोपासले पाहिजे, सभागृहात आयोजित कार्यक्रमातून कलावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.बिरसा मुंडा सभागृहाचे लोकार्पण चित्रपट लेखक, दिग्दर्शक श्री तुषार परांजपे यांच्या हस्ते झाले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात कशी संधी निर्माण होईल व मोठे कलाकार कस निर्माण होतील याविषयी चर्चा केली व माहिती दिली.स्पार्क फाउंडेशन चे संस्थापक श्री मकरंद दिक्षित यांनी सांगितले की दिलेल्या वास्तुचा आपण चांगला वापर करावा.संस्थाचालक श्री चंद्रकांत गणवीर यांनी स्पार्क फाउंडेशन चे आभार मानले.या कार्यक्रमाला सौ कुसुम झोले जिल्हा परिषद सदस्य,सौ. लता वारे सरपंच, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, पोलिस पाटील श्री विठ्ठल गोडे, सरपंच नरेंद्र येले, सरपंच देवराम कडु, ग्रामसेवक श्रीमती मंदा पारधी, श्री मधुकर कान्हात , श्री मिलिंद झोले, श्री चुनीलाल पवार, नितीन पिठोले, परशुराम गवारी, गणेश खादे, ग्रामपंचायत सदस्य, हर्षदा खादे, देवेंद्र कामडी श्री गणेश वाघ पत्रकार, श्री अशोक वाघ, सखाराम शिद, पांडुरंग वारे,भरत कोथे, धोंडीराम वाघ, आत्माराम वाघ, संजय वाघ, नामदेव काळे,मंगल काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 9 3 7 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *