चिखली: 10 सप्टेंबर 2022
चिखली तालुक्यासह संपुर्ण बुलडाणा जिल्हयात षिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून देणा-या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त इयत्ता 10 वी ते 12 वी परिक्षेमध्ये यष संपादीत करणा-या गुणवंत विद्यार्थी व विदयार्थींनींचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालयच्या वतीने चिखली येथील परमहंस रामकृष्णा मौनीबाबा संस्थानमध्ये दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.
चिखली परीसरातील उजाड माळरानावर आपल्या दुरदृष्टीतुन काळाची गरज पाहत अथक प्रयत्तनांती सुमारे 30 वर्षापूर्वी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी परमहंस रामकृष्ण षिक्षण संस्थेच्या माध्यमातुन षिक्षणाची गंगोत्री खेचून आनली. सिध्दविनायक उर्फ तात्यासाहेब बोंद्रे यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील केलेली कामगिरी या परीसरातील गोरगरीब शेतक-यांच्या मुलांचे भवितव्य घडविण्यात मौलाची ठरली आहे. अषा या कर्मयोगी तात्यासाहेब बोेंद्रे यांचा 12 सप्टेंबर 2022 रोजी 80 वा वाढदिवस अनुराधा परीवाराच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अनुराधा अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वी यष संपादीत केलेल्या विद्यर्थी विद्यार्थींचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिीती लाभणार आहे. तरी उपरोक्त कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थिीत राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण नन्हई यांनी केले आहे.
Users Today : 1