यात्रेकरूंची यात्रेकरूंची आर्थिक लूट..तर यात्रेकरूंवर काहिची दबंगगिरी
स्थानिक गुन्हे शाखा,अन्नभेसळविभाग,दारूबंदी विभाग,पोलिस प्रशासनाकडून कारवाईची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील शेंगोळा यात्रेत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून यात्रेकरूंची दिवसाढवळ्या लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्यांवर कारवाई करून यात्रेकरूंची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.कोरोना मुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बंद असलेली शेंगोळा यात्रा या वर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने जोमाने भरलेली आहे.यात्रेत पाळणे, खेळणे,स्टेशनरी-कटलरी, हॉटेल्स तसेच विविध प्रकारचे दुकाने थाटली आहेत.यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी मुख्य आकर्षण म्हणजे येथील देवी तुळसाई चे मंदिर आहे.राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या दत्त जयंती पासून या यात्रोत्सवाला सुरुवात होत असते,ही यात्रा तब्बल पंधरा ते वीस अविरत सुरू असते.या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातुन यात्रेकरू आवर्जून उपस्थित राहतात.पंधरा ते वीस दिवस पार पडणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल होत असते.सदर पंधरा ते वीस दिवस पार पडणारी ही यात्रा पहूर आणि जामनेर हद्दीत भरते.यात्रेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासना कडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येत असतो.या यात्रेत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून यात्रेला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीस हे अवैध धंदे पडत असतात.यात्रेत गावठी सह विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री,काली-पिली(गुडगुडी), यासह अन्य प्रकारच्या अवैध धंद्यांचा भडिमार पाहायला मिळत असतो.भररस्त्यावर हे काली-पिली(गुडगुडी) सारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून यात्रेत फिरायला येणाऱ्या कुटुंबाना याचा नाहक त्रास सोसावा लागत असतो. बऱ्याचवेळा या ठिकाणी किरकोळ कारणावरून भांडणे-हाणामारी होतात.अनेकजण आपल्या कुटुंबाला यात्रेत फिरायला सोडून देऊन स्वःता काली-पिली(गुडगुडी) या ठिकाणी खेळ खेळायला जातात.यात्रेत येणाऱ्या नागरिकांची याठिकाणी हातचलाखी करून दिवसाढवळ्या लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महिलांना तर संध्याकाळी असुरक्षित वाटत आहे कारण संध्याकाळी अवैध धंद्यांवाल्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे.यात्रेतील या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर स्वरूपाची कारवाई करून यात्रेत येणाऱ्या नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी व “अवैध धंदे मुक्त” यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शेंगोळा यात्रेचा नामोल्लेख करण्यासाठी कठोर पाऊले उचलावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 39