देव्हारी येथे शालेय व्यवस्थापन समितीवर विठ्ठल चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 
तालुक्यातील देव्हारी जि.प.शाळेत माझी शाळा, माझी जबाबदारी ‘अंतर्गत शाळा शालेय व्यवस्थापन समिती चे बैठक संपन्न झाली जि.प.प्रा.शाळा देव्हारी येथे बैठक आयोजित करण्यात आले होते.सुरवातीला या अध्यक्षस्थानी विठ्ठल चव्हाण, उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, रेश्मा जोतीलाल जाधव, मैना रवींद्र राठोड, सुरेखा दरबार राठोड, अफसर दगडू तडवी, सुरेश हंसराज राठोड, रवींद्र सरदार राठोड, राम पवार, अनिल जाधव, संजय जाधव, उपस्थित होते. त्यांनी क्रांतिकारक संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.सोबतच शालेय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, गोपाल चव्हाण, मुख्याध्यापक एम. एम गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक दिपक चोपडे सर यांनी केले, ते म्हणाले की, शालेय व्यवस्थापन समिती ही शाळेचा आत्मा व महत्वाचा कणा आहे, यावरचं शाळेचा विकास अवलंबून असतो. अध्यक्षीय भाषणात विठ्ठल चव्हाण यांनी ही सर्व सदस्यांनी पुर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती रचना, कर्तव्ये व जबाबदान्या गुणवत्तापुर्ण शिक्षण व ची जबाबदारी, निपुण भारत अभियान, बालकांचे हक्क व सुरक्षितता, शालेय आपत्ती व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळा विकास आराखडा, शाळेचे सामाजिक या विषयावर व विठ्ठल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच, उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम चव्हाण, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *