औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
राज्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्याना केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचाऱ्या प्रमाणे दरमहा एक हजार रुपये वैद्यकीय अंशदान द्या, निवृत्ताचा वृद्धापकाळ लक्षात घेता त्यांना वैद्यकीय सेवा सवलतीत पूरवा,३०जून रोजी सेवा निवृत्त झालेल्यांना राज्य शासनाने मा,न्यायालय निर्णयाप्रमाणे एक वेतन वाढ त्वरित द्यावी,केंद्र प्रमुख यांना एक वेतन वाढ द्यावी,सातव्या वेतन आयोगातिल थकीत दोन हप्ते शासनाने सेवा निवृतांना त्वरित द्यावेत,राज्यातील पेंशनर्स ला दर महिन्याला दिली जाणारी पेंशन पाच तारखेच्या आत व्हावी, सेवा निवृतांची जात वैद्यता प्रमाण पत्र अभावी
पेंशन रोखू नये अशा विविध मागण्यां सादर करीत शनिवार(ता,१७)रोजी औरंगाबाद येथील डॉ,ए,पी,जे,अब्दुल कलाम संशोधन केंद्रात पेंशनर्स डे साजरा झाला प्रथम कै,नाकारा व कै,हरिश्चंद्रराव जोशी
यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,सुधाकर शेळके होते,सहाय्यक लेखा व कोषागार अधिकारी सचिन अन्नपूर्वे ,जिल्हा शाखा अध्यक्ष वसंत सबनीस,उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी,रखमाजी जाधव,नामदेव घुगे,वैजापूर शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत,पैठणचे प्रा,वले, श्री मोरे, गंगापूर चे सद्भावे यांची उपस्थिती होती,पेंशनर्स डे गेल्या चाळीस वर्षा पासून दर वर्षी १७डिसेंम्बर या दिवशी देशभर साजरा करतात,जिल्ह्यातील १८सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आदर्श सेवा व्रती पुरस्कार ही प्रदान करण्यात आले,(फोटो कॅप्शन-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,शेळके ,उपस्थित सेवानिवृतांना मार्गदर्शन करतांना व्यासपीठावर वसंत सबनीस,धोंडीराम रजपूत, नामदेव घुगे व ईतर)