घाटबोरी : एनएमएमएस परीक्षेत आरती नवघरेचे घवघवीत यश

KHOZ MASTER
1 Min Read

घाटबोरी प्रतिनिधी :

नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, ‘पी.एम. श्री’ जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, घाटबोरी येथील विद्यार्थिनी आरती दीपक नवघरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMS) ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी शिष्यवृत्ती योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील परीक्षेत उत्तीर्ण होत आरतीने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आरतीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देशमुख, वर्गशिक्षक प्रमोद देशमुख तसेच सर्व शिक्षकवृंदांना दिले आहे. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःच्या चिकाटीच्या बळावर तिने या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कोरडे, समिती सदस्य तसेच सरपंच राजू पाखरे यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत

0 9 3 6 2 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *