देवेंद्र सिरसाट नागपूर
महाराष्ट्र राज्यात सरकार येतात आणि जातात.परंतु आज पर्यंत इलेट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांच्या ज्वलंत समस्या समजून घेतल्या जात नाहीत. हे सरकार तरी इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांच्या समस्येवर योग्य निर्णय घेईल का ? असा प्रश्न इ आर डी ओ चे राष्ट्रीय अध्यक्ष व एम ए इ एच चे राज्य अध्यक्ष डॉ. सतिश जगदाळे यांनी केला आहे.महाराष्ट्र राज्यात सुमारे 30 हजार इलेक्ट्रोहोमिओपॅथी चे चिकित्सक आहेत. इलेक्ट्रोहोमिओपॅथी ची संघटना मागील 25 वर्षा पासून शासन मान्यतेसाठी संघर्ष करीत आहे. मागिल अनेक वर्षांपासून मुंबई,नागपुर तसेच अनेक जिल्हा स्तरावर आंदोलने झाली. निवेदने दिली या साठी संघटनेच्या दोन सदस्यांनी आपल्या प्राणाची आहुती ही दिली.पण अद्याप एका ही सरकारने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांना न्याय दिलेला नाही.न्यायालयाने ही इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकांच्या बाजूने निर्णय दिले आहेत.राजस्थान सरकार ने या चिकित्सा पद्धतीला एक स्वतंत्र चिकित्सा पद्धती म्हणून मान्यता दिली आहे.याच प्रमाणे हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब अश्या अनेक राज्यात या चिकित्सा पध्दतीला मान्यता देण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. केंद्र शासनाने ही या चिकित्सा पध्दतीला मान्यता देण्यासाठी एक उचच स्तरीय समिती गठीत केली आहे. महाराष्ट्र शाशनाने ही इलेक्ट्रोहोमिओपॅथी च्या चिकित्सकांना न्याय मिळेल यासाठी एक नवीन नियमावली तयार करून या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही !
डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे.
इलेक्ट्रोहोमिओपॅथी ला मान्यता मिळण्यासाठी मागिल 25 वर्षा पासून संघर्ष सुरू आहे. त्यात मुंबई तेथे सन 2003 दोन सदस्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे जीवनदान व्यर्थ जाणार नाही.मान्यता मिळे पर्यंत संघर्ष सुरूच राहणार त्यासाठी धरणे,आंदोलन,प्रसंगी भूक हडताल व आमरण केले जाईल.या वर्षी ही एम ए इ एच तर्फे नागपूर येथील यशवंतर स्टेडियम समोर सोमवार दि 19/12 /2022 धरना आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन डॉ.सतिश जगदाळे पुणे, डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे नागपूर,प्रशांत सोनवणे धुळे व संघटनेच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी केले
आहे.