बुलडाणा:-(कार्यालय प्रतिनिधी)
बौध्द धर्मात भोजनदान हे श्रेष्ठ दान मानले जाते म्हणून रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे विदर्भ संघटक तथा बुलडाणा जिल्हा रिपाई नेते भाऊसाहेब सरदार यांनी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने विजया दशमीच्या शुभ मुहर्तावर बोधीसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागवंशी नागपूर येथे हिन्दू धर्माचा त्याग करुन बुध्द धर्माचा स्विकार केल्याच्या घटनेला ६८ वर्ष पूर्ण झाले असून त्या पावन दिक्षाभूमीवर दर्शानासाठी जाणाऱ्या धम्म बांधवाना मलकापूर रेल्वे स्टेशन येथे भाऊसाहेब सरदार यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार चैनसुख संचेती यांचे प्रमुख उपस्थितीत भोजनदान वाटप करण्यात आले या या कार्यक्रमाचे आयोजन आरपीआय आठवले गटाचे विदर्भाचे मुख्य संघटक भाऊसाहेब सरदार यांनी केले होते होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार चैनसुख संचेती यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते भोजनदान वाटप करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले बौद्ध धम्मामध्ये भोजनदान हे सर्वात श्रेष्ठ दान असे मानले आहे हे सर्वांनीच केले पाहिजे डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की, आपल्या कमाईचा विसावा हिस्सा समाजासाठी,धम्मासाठी दान केला पाहिजेत असे प्रतिपादन माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले असून कार्यक्रमाला रिपाई तालुकाध्यक्ष दिलीप इंगळे, रिपाई जिल्हा युवा नेते मंगेश मेढे तालुका सरचिटणीस जयपाल मोरे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील अहिरे,ज्येष्ठ नेते भाई तुळशीराम गारुळे,भाई गुलाब गोरे ,अनिल वानखेडे , जनार्दन झनके ,सिद्धार्थ दांडगे इतरही असंख्य रिपाई कार्यकर्ते तसेच बौद्ध उपासक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष दिलीप इंगळे यांनी केले तर आभार शंकर निंबाळकर यांनी केले