नागपूर
डिसेंबरला पार पडल्या यात रायपूर ग्रामपंचायत साठी ७२.९९ टक्के मतदान झाले,वागदरा येथे ८२.६७ टक्के येवढे मतदान झाले नागलवाडी येथे ६१.००,कवडस ग्रामपंचायत साठी ७९.८१ टक्के तर खैरी पन्नासे येथे ८९.६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला चिचोली पठार ग्रामपंचायत साठी ९१.४९ येवढे मतदान झाले तर उमरी वाघ ग्रामपंचायत करीत ८१.२३ टक्के मतदारांनी मतदान केले, सर्वाधिक मतदान हे पठारी तसेच आदिवासी बहुल गाव असलेल्या चिचोली पठार येथे झाले ९१.४९ येवढे मोठ्या प्रमाणात मतदान झाले रायपूर गाव वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान पार पडले परंतु नेहमीच निवडणूक काळात संवेदनशील रायपूर येथे मतदान काळात तनाव ग्रस्त झाले होते येथे राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले होते जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांचे सोबत एस आर पी एफ जवानांची बाचाबाची झाली तेव्हा परिस्थिती अधिकच तनाव ग्रस्त बनली होती ठाणेदार विशाल काळे यांनी ताबडतोब मध्यस्थी करत प्रकरण निवळले, दिनेश बंग हे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांचे चिरंजीव आहेत, माजी मंत्री बंग यांनी सुध्दा मतदानाचा हक्क बजावला प्रथमदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह दिसून आला.
खोज मास्टर करीता देवेंद्र सिरसाट हिंगणा, नागपूर.