1 जानेवारीला शेतकरी वारकरी परिषद भुमीपुत्रच्या प्रदेश उपाध्यक्ष पदि विश्वनाथ शेवाळे यांची नियुक्ती…..
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या नियोजना संदर्भात संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम येथे भूमिपुत्रची बैठक संपन्न झाली. भूमिपुत्र च्या वर्धापनदिनी शेतकरी / वारकरी परिषद घेतली जाणार आहे. पश्चिम विदर्भातील कीर्तनकार, प्रवचनकार,दिंडीचालक यांचा कष्टकरी शेतकऱ्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. सोबतच शेतकरी वारकरी परिषदेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कृषीपंपाला मोफत वीज, पीक विमा बंदि आणि राज्यातील वारकरी शिक्षण संस्थाना अनुदानचा ठराव घेऊन सरकार ला पाठवला जाणार आहे.आजच्या बैठकीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदि केनवड येथिल सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आसुन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भुमीपुत्र घरा घरात पोहचवनार आसल्याचे शेवाळे यांनी सांगीतले. यावेळी रिसोड तालुक्यातील युवा कार्यकर्ते सागर जाधव यांची रिसोड तालुका युवक उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीला माधवराव हिवाळे, विश्वनाथ शेवाळे, उत्तमराव आरू, संतोष सुर्वे, सचिन काकडे, विनोद घुगे, ज्ञानेश्वर सोमटकर, महादेव इढोळे, सागर जाधव, बालाजी बोरकर , सोसे साहेब बैठकीस उपस्थित होते.