पालघर प्रतिनिधी : सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यात मोठ्याप्रमाणावर खेळाडु आहेत नुसतेच क्रीकेटचे नव्हे तर सर्वच खेळात प्रावीण्य मिळवणारे खेळाडू आहेत मात्र तालुक्यात कुठेही या खेळाडुंसाठी हक्काची जागा नसल्याने अनेकदा यांची कुंचबना होत असते.यामुळे आज याभागातील आमदार सुनिल भुसारा आणि जिप अध्यक्ष प्रकाश निकम यांनी क्रीडा विभागाकडून एक हक्काचे क्रींडागण उभारावे असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती तथा आदिवासी क्रीक्रेटअसोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप वाघ यांनी मोखाड्यात केले आदिवासी क्रिकेट लीगच्या सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले जिल्हा परीषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी क्रिकेट खेळातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक तरुण मुले यावर्षी सरपंच सदस्य देखील झाली याचा मला अभिमान वाटतो खेळ खेळताना आपल्या आईवडिलांच्या स्वप्नपुर्तीसाठी देखील झटावे स्पर्धा परीक्षांत भाग घ्यावा असे आवाहन सर्व क्रीकेट प्रेमीना केले तसेच पुढचे सामने हक्काच्या ग्राउंड होतील अशी खात्री देखील दिली.यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी मोखाडा तालुक्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असून स्वातंत्र्यानंतर पासूनचा मोखाडा शहराचा पाणी प्रश्न मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सोडवला त्या प्रमाणेच आता नगरपंचायत क्षेत्रात अनेक जागा आरक्षित असून त्या जागापैकी एखाद्या जागेवर असे भव्य क्रींडांगण नक्की उभारु असा शब्द यावेळी दिला.यावेळी भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलींद झोले यांनी उपस्थित खेळाडुंचे मनोबल वाढवत शुभेच्छा देताना खेळांडुंच्या अडीअडचणीत मी सदैव पाठीशी असेन असे आश्वासन दिले यावेळी सभापती भास्कर थेतले सदस्य युवराज गिरंधले,भाजप तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे, जेष्ठ नेते रघुकाका डिंगोरे तसेच या सामन्यांचे आयोजक संजय शेळकंदे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.