फर्दापुर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र 3 मधील शौचालयाचे दुषित सांडपाणी रस्त्यावर

Khozmaster
4 Min Read
त्या प्रभागातील   नागरिकांचे आरोग्य धोक्यात
फर्दापुर प्रतिनिधी गोकुळ सिंगराजपूत यांच्या कडुन
सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये सराई कडे व  गावांमध्ये  जाणाऱ्या या रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात ये जा करणाऱ्या टू व्हीलर व नागरिकांची  वर्दळ असते त्या रस्त्यावर काही लोकांच्या  जाणून बुजून  दुर्लक्षपणामुळे त्यांच्या  शौचालयाचे,दुषित सांडपाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत असून या रस्त्यावर पावसाळ्यात ज्या प्रकारे चिखलाचे स्वरूप पाहावयास मिळते तेच चित्र आज रोजी बघावयास मिळत आहे. मात्र ज्या ज्या  नागरिकांच्या घरातील शौचालय, मुतारीचे सांडपाणी वाहून रस्त्यावर येत आहे त्या प्रभाग क्र तीन मधील  आजू बाजूच्या  नागरिकांचे  शौचालयाचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असून त्या वाहणाऱ्या सांडपाण्या मुळे मोठ्या प्रमाणात  चिखल होत आहे. ये जा करणाऱ्या टू व्हीलर  स्लिप होऊन छोटे मोठे अपघात होत आहे.गेल्या आठवड्यात अत्यन्त गरीब कुटुंबातील एक महिला जी मोळी विकून आपला उदरनिर्वाह करते ती महिला गाडी स्लिप होऊन गाडी पडली असून तिला जबर मार लागला असून  आज रोजी ती महिला औरंगाबाद येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.गुरुवारी आठवडी बाजारातुन एक महिला बाजार घेऊन येत असताना पडली या सर्व प्रकारची माहिती प्रभाग क्र  3 मधील नागरिकांनी  ग्रामपंचायत मधील सरपंच,सदस्य,यांना निदर्शनास आणून दिली असता त्यांनी पाहणी केली मात्र उपाय काढू शकले नाही.शाळेतील लहान लहान  मुलांना ,वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावर  काही अंतरावर दर्गा  आहे. व  दक्षिणेस मुस्लिम बांधव यांची मज्जीत आहे. मुस्लिम बांधव दिवसातुन ५,६ वेळा  नमाज पठण  करण्यासाठी येतात त्यांच्या अंगावर ते सांडपाण्याचे शिंतोडे उडतात.ग्रामपंचायतला हे दिसत नाही का? शासनाचा लाखो रुपयांचा  निधी येतो मात्र खर्च होतांना दिसत नाही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी  सदस्य या समस्येवर उपाय योजना काढत नसेल तर खूप मोठी शोकांतिका आहे. असेच म्हणावे लागेल  तेच वाहणारे  सांडपाणी पुढे एका किराणा दुकाना समोर साचले असून गटारी तुडुंब भरली आहे. त्या ठिकाणी डुकरे बसतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढले असून काही नागरिक,लहान लहान मुले  सुद्धा आजारी  पडले आहेत. डेंगू सारखा आजार सुद्धा  होऊ शकतो.प्रभाग क्र तीन मधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून याला बेजबाबदार ग्रामपंचायत आहे . ज्या  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे  त्या नागरिकांनी सांडपाणी वाहून येणाऱ्या लोकांना  समज दिली की तुमचे शौचालय, मुतारी सांडपाणीचा तुम्ही  बंदोबस्त करावा तुमच्या पाण्याची वाहणारी दिशा रस्त्यावर नाही किंवा तुम्ही तुमच्या घराजवळ शोषखड्डा खोदून बंदोबस्त करावा. तेव्हा त्यानीं त्या नागरिकांना  असे उत्तर दिले की आमचेच तुम्हाला सांडपाणी दिसते का ? या गंभीर समस्ये बद्दल गावातील सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, व प्रभाग क्रमांक तीन  मधील ग्रामपंचायत सदस्य यांना सांगून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. शेवटी त्या भागातील नागरिकांनी धाव घेत आपली समस्या  पत्रकार  प्रविण तायडे यांच्या कडे मांडली असता त्यानीं  ताबडतोब  ग्रामसेवक सुनील मंगरुळे,यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. व माजी ग्रा.प.सदस्य भीमा बोराडे यांना समक्ष ज्या रस्त्यावर शौचालयचे  सांडपाणी वाहत होते त्या ठिकाणी बोलवून निदर्शनास आणून दिले की ज्या ज्या  नागरिकांचे शौचालय, मुतारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे या भागातील  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून  याला बेजबाबदार ग्रामपंचायत,असेल त्यानीं रस्त्यावर वाहणाऱ्या या  सांडपाणी चा शोषखड्डा खोदून 2 दिवसात  बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत अन्यथा नागरिक पंचायत समिती सोयगाव गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार निवेदन देण्यात येईल असा इशारा दिला असून ग्रामपंचायत ला ठिय्या आंदोलन करणार आहे याची लवकरात लवकर दखल  घेण्यात यावी  नागरिकांनी  मागणी केली आहे…
कोट
फर्दापुर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक तीन  मधील ज्या ज्या लोकांच्या शौचालयाचे घाण पाणी रस्त्यावर येत असून त्या घाण पाण्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे त्या शौचालयाचे घाण पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतीच्या वतीने कायदेशीर नोटीस देऊन सदरील रस्त्यावर त्यांच्या शौचालयाचे दूषित सांडपाणी बंद करावे असे कळवले जर त्यांनी ऐकलेच नाही तर त्यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत वतीने कडक कारवाई करण्यात येईल.
सुनिल मंगरुळे ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय फर्दापुर
0 6 3 6 6 5
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *