कुंभारी येथे खंडापूरकर बाबा यांच्याकडून राज्यस्तरीय शिबिर स्थाळाची पाहणी

KHOZ MASTER
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील कुंभारीण येथे सोमवार रोजी अजिंठा येथे तसेच कुंभारी येथे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर हे आले असता त्यांचे स्वागत अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व सोयगाव तालुका अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांनी केले व नंतर श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी राज्यस्तरीय शिबिर स्थळ पाहणी केली व यात बाबांनी प्रामुख्याने महिलांसाठी निवासस्थान संडास बाथरूम महिलांची होणारे सोय या गोष्टी अतिशय बारकाईने बघितल्या म्हणजेच आज बाबा किती आपल्या मुलींसाठी काळजी घेतात ते संघटनेतील महिला पदाधिकारी यांना कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही बघत माझी आई माझी बहीण माझी मुलगी या उद्देशाने त्यांचा विचार करतात हे खूप उल्लेखनीय आणि बाबा विषय जेवढं बोलावं तेवढं कमी आहे तसेच पुरुष मंडळी साठी सुद्धा बाबांनी थंडीचे दिवस आहेत गरम पाणी झोपण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून आणि पाहणी करून स्वतः निर्णय घेतला दिवसभर उपाशी राहून संघटनेच्या मुला मुलींना एक जीवापाड प्रेम देणारे असा अवलिया पुन्हा ना होणे हे लक्षात घ्या असो आज माझ्या डोळ्यातून पाणी आले कारण की बाबांनी स्वतःच्या जीवाकडे तब्येतीकडे किंवा गोळी औषधे कधीच बघितली नाही स्वतःचा विचार केला नाही फक्त संघटना आणि संघटना आणि संघटनेतील महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ता हे माझे देव दैवत आहे हे आज बाबांनी प्रत्यक्षात दाखवून दिले खरोखर बाबांना मानावे लागेल चला मला तर आज बाबांसोबत बरेच तास वेळ घालण्याचा आणि काम करण्याचा योग आला  मी स्वतःला भाग्यवान समजतो यावेळी उपस्थित अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष,प्रभाकर साळवे प्रदेश सरचिटणीस,इकबाल कासम तडवी बागुल जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग औरंगाबाद, श्री गोकुळ सिंग राजपूत तालुकाध्यक्ष सोयगाव,शेख अझहर तालुका सचिव सोयगाव, माधव भाऊ साळवे कुंभारी, येथील सरपंच गावातील सर्व पदाधिकारी तसेच संघटनेतील संघटनेचे सर्व महिला पुरुष पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते यावेळी बाबांनी काटेकोरपणे राज्यस्तरीय शिबिर स्थळाचे अगदी बारीक ईने निरीक्षण करून प्रदेशाध्यक्ष श्री अरुण चव्हाण देशमुख यांना काही शिबिरा विषयी सूचना करण्यात आल्या आहेत.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *