औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती वर्चस्व राखत १८ पैकी १३ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चा झेंडा फडकावला.तर ४ ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली तथा एका ग्रामपंचायत वर अपक्षांची सत्ता आली त्यावर भाजपाने दावा केलेला असल्याने अशाप्रकारे भाजपा ५ ठिकाणी निवडून सत्तेत आले आहे.भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी ही आपल्या निल्लोड गटात वर्चस्व राखत दोन ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावला.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वर मोठे यांच्या गाव बोरगाव कासारी सहीत निल्लोड सर्कल मधील भाजपाच्या अनेक जुन्या व मोटे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना फोडत शिंदे गटात प्रवेश देऊन अब्दुल सत्तार यांनी ज्ञानेश्वर मोटेंना शह देण्याचा प्रयत्न केला होता.पण ज्ञानेश्वर मोटे यानी निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले तथा निल्लोड येथे विलास पुर्णाजी आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत अब्दुल सत्तारांना ज्ञानेश्वर मोटेंनी शह देत उत्तम माणिकराव शिंदे यांना शिवसेनेतून भाजपात आणुन सरपंचपदी विराजमान केले.भाजपा कडुन प्रदेश चिटणीस इद्रीस मुल्तानी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर,माजी पंचायत समिती सभापती अशोक दादा गरुड,दिलीप दाणेकर,सुनील मिरकर, आदींनी निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली.तरी अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीत मुसंड मारली.तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशाच चुरशीच्या च्या लढती पाहायला मिळाल्या.अशी माहिती बबलूशेट सोयगाव यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 39