मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक. 11 मध्ये 14 वा आयोग अंतर्गत डेव्हलप मेंट ऑफ ग्रीन बेल्ट नावाने
मुर्तीजापुर न प अंतर्गत वृक्ष लागवडी गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमरण उपोषण आज दिनांक 20 डिसेंबर 2022 पासून सुरुवात केली आहे.वृक्ष लागवड करण्यात आले होते.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्यावर अनेकदा निवेदन तक्रार करूनही कारवाई झाली नाही. संदर्भात
महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पालकमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.म्हणून आज दि .13/12/22 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुर्तिजापूर तर्फे जिल्हाधिकारी यांना आठ दिवसांचा अल्टीमेटम निवेदना द्वारे देण्यात आला आहे. या आठ दिवसात भ्रष्टचार करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही न केल्यास दि.20/12/22 पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गौरव पाटील मोरे यांनी दिला होता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्या राज्यात या झालेल्या भ्रष्टाचार पोल उघड महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केली आहे परंतु अद्यापही प्रभाग क्रमांक 11 मध्ये वृक्ष लागवडी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारात कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हा पक्ष सर्वांना न्याय देणारा असुनी त्याचे भूमिका वर संशय व्यक्त केल्या जात आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून करावे लागले सदर उपोषणाला सहकारी मित्र म्हणून किशोर मालवे वैभव महल्ले प्रजेश बुटे रोहन नवघरे इत्यादींनी सहकार्य केले आहे मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.