सोयगाव तालुक्यात रब्बी पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषि विभागामार्फत आवाहन

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात रब्बी पिक हंगाम स्पर्धासाठी शेतकऱ्यांना सोयगाव कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी सतत प्रयोग करीत असतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर केली आहे. जो शेतकरी अधिक पीक उत्पादन घेईल, त्या शेतकऱ्यास कृषी विभागाच्या वतीने बक्षीस देण्यात येईल. सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हरभरा, गहु पिकाचा या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे.यात सर्व साधारण गटासाठी कमीत कमी 10 व आदिवासी गटासाठी 5 शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहेत. या पिकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी सोयगाव या कार्यालयात हे अर्ज सादर करणे आवश्यक आहे
पीक उत्पादन वाढ पिकस्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य पातळी वर अशी त्रिस्तरीय बक्षिसे देण्यात येणार आहेत. तालुक्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यास पाच हजार, द्वितीय तीन हजार व तृतीय दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येते.तसेच
जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे या योजनेत दिली जाईल.
▪️स्पर्धेच्या अटी काय?
“”पीक उत्पादन वाढवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे जमीन मालकी हक्काचा पुरावा दर्शविणारा सातबारा असावा. शिवाय स्पर्धेचे शुल्क ३०० रुपयांचा भरणा केल्याची पावती सादर करावी.
▪️हरभरा, गहु पिकांसाठी स्पर्धा
“”गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाकडून रब्बी पीक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी स्पर्धा घेतली जाते. सोयगाव तालुकयासाठी यंदा हरभरा, गहु या पिकाचा रब्बीतील पीक उत्पादक स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे.पीक उत्पादन वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. या स्पर्धेसाठी ३०० रुपये शुल्क चलन स्वरूपात भरणे बंधनकारक आहे.जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकायांच्या मार्गदर्शनाखाली पिक कापणी प्रयोगच्या नियमानुसार पिक स्पर्धा घेतली जाईल.जास्तीत जास्त शेतकयांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन  सोयगाव तालुका कृषी अधिकारी एस. जी. वाघ यांनी केले आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *