तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता प्रतिनिधी देऊळगाव राजा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देवगाव राजा येथे करीयर विथ कॅरेक्टर हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरानी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले, कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा अश्विनी जाधव यांनी वेगवेगळ्या समाजसुधारकांचे उदाहरण देत महत्त्वाचे पैलू सगळ्यांसमोर सादर केले जसे की संस्कृती कशी जपली पाहिजे, अंधश्रद्धा दूर केली पाहिजे, कर्माने व कर्तुत्वाने श्रेष्ठ असावे, विद्यार्थ्यांचे आचरण कसे असावे आणि मुलींनी समाजात जगताना आत्मविश्वास बाळगणे खूप महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर प्रा श्वेता धांडे यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत दुसऱ्यांच्या अनुभवातून मोठे व्हावे हा मोलाचा संदेश दिला. प्रा सीताबाई ढाकणे यांनी आधुनिक गोष्टींचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना पटवून दिले की मोबाईल व अवांतर अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून करिअर कडे लक्ष केंद्रित करावे. अध्यक्षपदी लाभलेल्या अर्चना जत्ती यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांचा आई-वडिलांची त्यांच्या विषयीची असणारी आपुलकी, प्रेम, कष्ट व त्यांचे करियर घडवण्याच्या प्रयत्नांची व तळमळीची जाणीव ठेवावी हा संदेश दिला. या कार्यशाळेस प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ऋतुजा जाधव व आभार प्रदर्शन प्रा सोनाली इंगळे यांनी केले तर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा शिवकन्या दरेकर यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.