प्रतिनिधी स्वप्नील गणगणे
मुर्तीजापुर ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्रामात तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोनाळा गट ग्रामपंचायतिचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत सरपंच पदासाठी रामेश्वर गंगाधर मुगल (काका) विरुद्ध नितीन प्रकाश मुगल (पुतण्या )त्यांच्या लढतीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी काट्याची लढत होऊन काकांनी पुतण्याचा 144 मतांनी दारून पराभव केला त्याच्या संपूर्ण पॅनलच्या सातच्या सात सीटा निवडून आणल्या भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे स्वतःचे मतदार केंद्र असलेल्या सोनाळा गावात सरपंचसहा पूर्ण पॅनलचा धक्कादायक पराभव झाल्याने मोठा धक्का बसला
तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमरी अरब सरपंच पदाची निवडणूक पहिलेच बिनविरोध झाली होती केवळ एक सदस्यासाठी निवडणूक झाली बाकी सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते तर खापरवाडा येथील सरपंच पदाची निवडणुकीत अभिजीत संजय टापरे विरुद्ध विजय वासुदेव धारपवार यांच्या काठीची लढत होऊन ई व्ही एम नुसार अभिजीत संजय टापरे विजय झाले असता बॅलेट पेपर नुसार बॅलेटचे मतदान विजय धारपवार यांना मिळाल्याने दोन्ही उमेदवारांनी बरोबर साधली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ईश्वर चिट्ठी काढून विजय वासुदेव धारपवार यांना सरपंच पदी विराजमान घोषित केले तसेच मदापुरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी अंजली प्रदीप ठाकरे तर सदस्य पदी प्रदीप हरिदास ठाकरे दोघेही पती-पत्नी निवडून आले आहेत मागील निवडणुकीत ते माजी सरपंच होते तालुक्यातील 51 ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्य पदासाठी ची मतगणना पूर्ण होऊन 29 महिला सरपंच तर 22 पुरुष सरपंच ग्रामपंचायतीसाठी निर्वाचित झाले.