स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बालिका शिक्षण विषयांतर्गत वर्ग आठ, नऊ आणि दहा किशोरवयीन मुलींचे मानसिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली उद्बोधन वर्ग संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला विद्याभारती पश्चिम विदर्भाचे सहमंत्री माननीय श्री रामेश्वरजी कुटे सर तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सौअनघाताई महाजन विद्याभारती पश्चिम क्षेत्र बालिका विभाग प्रांत सहप्रमुख, तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रमोदजी ठोंबरे सर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याचे सहमंत्री माननीय श्री गोपालकृष्ण कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय करून देताना राष्ट्र संस्कारक्षम बनवायचं असेल, एकसंघ बनायचं असेल तर सर्वात प्रथम परिवार संस्कारक्षम व्हायला हवा आणि परिवार संस्कारक्षम होण्यासाठी मुली म्हणजेच सक्षम व्हायला पाहिजे. कारण मुली या परिवाराच्या मेरुदंड असतात आणि संपूर्ण परिवाराला एकसंघ करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यासाठीच आजच्या उदबोधन वर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ अनघाताई महाजन यांनी आपल्या मनोगताद्वारे स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये पंच इंद्रिय असतात त्यांना जागृत करणे हे आपले कर्तव्य आहे आणि साधनेच्या माध्यमातून आपण ते जागृत करू शकतो असे सांगितले त्यासाठी आजची मुलगी ही उद्याची नारी त्यामुळे ती शारीरिक मानसिक सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, पुण्यशोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याभारती चिखली तालुक्याचे तालुका मंत्री श्री मुकेशजी भवर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वाघ सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. सदर वर्गासाठी मोठ्या संख्येने विद्यालयातील मुली व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.