पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी
आज मोखाडा येथे कातकरी समाजातील शेतकरी बांधवांना कृषी व प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण, वर्गात श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी सांगितले की
कातकरी बांधवांना कृषी, पशुसंवर्धन व आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध योजनांचा लाभ देऊन शेती,फुल शेती, पशुपालन, क्षेत्रात अधिक लक्ष दिल्यास नक्कीच कातकरी बांधवांना स्थलांतर व रोजगारा साठी बाहेर पडावे लागणार नाही.यामुळे शिक्षण व आरोग्याकडे देखील कातकरी बांधवांना लाभ होईल तसेच शेतकरी समृद्ध होतील असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.यावेळी मोखाडा पंचायत समिती चे सभापती श्री भास्कर थेतले, उपसभापती श्री प्रदीप वाघ,पंचायत समितीच्या सदस्य सौ लक्ष्मी भुसारा,अनिता पाटील , तालुका कृषी अधिकारी श्री पारधे, कातकरी समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री नडगे व मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते.
Users Today : 27