मुख्यमंत्र्याची भाषा अरेरावीची व उद्दामपणाची: शंभुराज देसाई.

Khozmaster
1 Min Read
तर कर्नाटकाला देणाऱ्या पाण्याचा विचार करू

देवेंद्र सिरसाट नागपूर 
 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. सहन करण्याची मर्यादा असेत. आमचा संयम सुटत आहे. त्यांच्या भाषेच उत्तर देऊ. मराठी भाषींवर अन्याय केला तर उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करू, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे भडकविणारे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच्या अनुसरून नाही. सीमावर्ती भागातील जनतेला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठिशी राज्यातील संपूर्ण जनता आहे. एकही इंज जागा न देण्याची भाषा करीत आहे. एक इंज काय आम्ही अर्धी इंचही जागा देणार नाही. त्यांना अरेरावीची भाषा थांबविली नाही, तर त्याच्या शंभर पटीने आम्हाला बोलता येते. छत्रपत्री शिवाजी महाराज यांनी दक्षिण दिग्विजय केला होता. याची आठवण त्यांना असावी. मार्च, एप्रिल व मे महिन्यात त्यांना पाण्याची गरज असते. राज्यातील कोयना व कृष्णा नदीतून पाणी देण्यात येते. पाण्यासाठी त्यांच्याकडून राज्याला विनंत करण्यात येते. त्यांचे वागणे असेच राहिले तर उन्हाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *