औरंगाबाद येथे दोन अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी अत्याचार;शहर हादरले

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शहरात दोन बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. वाळूज औद्योगिक नगरीत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत शाळेतून ढाब्यावर नेत १०वीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी एकटी असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला घरातून कपाशीच्या शेतात ओढत नेत बलात्कार करण्यात आला दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.वाळूज औद्योगिक नगरीतील शाळेत १०वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील ढाब्यावर नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आरोपीने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच ढाब्यावर इतर मुलींवर बलात्कार केला होता.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवा चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे.तर दुसऱ्या घटनेत आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन पाणी पिण्याचा बहाना करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच घडलेल्या घटनेनं प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश येडूबा मोरे असे नराधमाचे नाव असून दोघांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *