राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवाच्या आढावा बैठकीत; संदीप मानकर यांचे मार्गदर्शन

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जिल्ह्यातील सिल्लोड शहरात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषीमंत्री मा.नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या संकल्पनेतुन डोळ्याचे पारणे फेडणारा राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव-२०२३ यंदा सिल्लोड शहरात होत असून यांसाठी शासनस्तरांवर जंगी तयारी सुरु आहे. कृषी, कला व यांसोबतच क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून दि.०१ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ भरगच्च कार्यक्रम घेतले जाणार आहे. या महोत्सवात देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावणार असून, राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रथमच राज्यांतील मोठमोठी असणारे चारही कृषी विद्यापीठाची याठिकाणी विशेष उपस्थिती असणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.महोत्सवात कृषी प्रदर्शनाचे एकूण ७०० स्टॉल लागणार आहेत व सुमारे २ लाखांच्या वर नागरीक उपस्थित होणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
 याच अनुषंगाने कृषी महोत्सवाचे नियोजन कसे असावे, नागरिकांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये यासंदर्भात सिल्लोड येथील सेना भवन येथे नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या आढावा बैठकीत मला या कृषी महोत्सवाच्या माध्यमांतून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून उपस्थित झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींना उपस्थित मार्गदर्शन करण्याची संधी नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिली. याप्रसंगी सदरील साजरा होणारा कृषी महोत्सव सुवर्णमहोत्सव कशा पद्धतीने साजरा होईल यांविषयी संदीप मानकर यांनी सखोल अशें मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कर्तव्यदक्ष कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, जि.प.उपाध्यक्ष केशवराव पा.तायडे, औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कृ.उ.बा.समितीचे सभापती अर्जुन पा.गाढे, अशोक सूर्यवंशी, डॉ.मश्चिंद्र पाखरे, जि.प.सदस्य दामू अण्णा गव्हाणे, दत्ता.पा. कुडके, मारोती पा.वराडे व सोयगाव कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी आदींसहित ज्येष्ठ नेतेगण यांची उपस्थिती होती तर समोर सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील विराट जनसमुदाय उपस्थित होता.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *