नागपुरी..
अधिवेशन सुरवांत
वाजू लागे चौघडा
रोज तो महोत्सव
बातम्या तडा तडा
विधेयक कुठलेही
जोरां हाणून पाडा
धावत्या गाडीखीळ
घालतो का खोडा
फालतू कारणास्तव
खुर्चीभोवती गराडा
वेळ अन् संपत्तीचा
नको उगाचं चुराडा
प्रश्नांस उत्तरे देता
माहिती खडा खडा
निरुत्तर ते विरोधक
बोलायचे भडाभडा
चुकीचे होता काही
विरोध करा तगडा
जनतेचेकल्याणार्थ
सार्थ ठरावा झगडा
प्रकल्प मंजूर होता
मनाचे चक्छु उघडा
भल्या गोष्टी घडता
नको बा नन्ना पाढा
अश्लाघ्य दिसे जिथं
तिथे हमखास नडा
संविधान आरशाला
नको पडायला तडा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
Users Today : 16