वडाळी देशमुख ग्रामपंचायतला ग्रामसेवक केव्हा मिळणार नागरिक संप्रभात

Khozmaster
2 Min Read
अर्धवट घरकुले पडले वाऱ्यावर
अकोट  प्रतिनिधी विशाल गवई 
वडाळी देशमुख मधील घरकुल लाभार्थ्यांना जून महिन्यामध्ये पहिला टप्पा मिळाला तेव्हापासून ग्रामपंचायतला ग्रामसेवक नसल्यामुळे लाभार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे,एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज नगरा मधील मजूर वर्गाला वास्तव्यास ४० वर्षात त्यांना घरकुल मिळाले त्याचा आनंद होत आहे तर ग्रामसेवक नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक नागरिकाला गावामधील ग्रामपंचायत निकटचा संबंध असतो कुठल्याही कागदपत्र म्हटला की ग्रामपंचायत प्रशासनाचा रहिवासी दाखला, घर टॅक्स पावती, घराचा आठ, नमुना आठ, सरपंचाचा दाखला, ग्रामसेवक दाखला अशा विविध कागदपत्रांची विद्यार्थ्यांना गरज भासत आहे,
गेल्या ४ महिन्यापासून ग्रामपंचायतला ग्रामसेवक नसून येथील ग्रामसेवक विना चालतोय ग्रामपंचायत अशी दयनीय गंभीर बाब समोर येत आहे,
गेल्या ४-११-२०२२ला अकोट तहसीलवर गट विकास अधिकारी व अकोला जिल्हाधिकारी यांना महिला व पुरुष घरकुल लाभार्थ्यांनी आकोट पंचायत समितीवर त्यांचा मोर्चा घेऊन निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाच न्याय मिळाला नसून ते आज रोजी मोलमजुरी करून पोट कसे भरावे व घर कसे बांधावें या विवंचितेत अडकले आहेत, काही लाभार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याच्या घराचा वापर करावा लागत आहे तर काहींनी चक्य घराचा तडव ताडपत्रीने आपली राहोटी रस्त्यावर उभारली आहे पावसाळ्याच्या दिवसाला तर थंडीला दिवसाला त्यांना त्रास सहन करून पहिला टप्पा मिळून घरे अर्धवट पडलेली आहे तरी अकोट पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी या गावाला ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा ,काही दिवसात जर ग्रामसेवक नाही मिळाला तर अकोट पंचायत समितीवर महिला व नागरिक सर्वांनी मिळून आमरण उपोषणाला सुरुवात करू असे शासनाला आव्हान केले आहे,
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *