प्रतिनिधी विशाल गवई अकोट
मा.कार्यकारी अभियंता आकोट यांना वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. राहुल नगर येथील रहिवाशी श्री.सुखदेवराव रामचंद्रराव तेलगोटे हे गरीब कुटुंब असलेल्या नागरिकांना इलेक्ट्रिक बोर्ड आकोट यांनी दिलेले मनमानी विजेचे बिल हे 65690रुपये दिलेले आहे यांचा घरातील विजेचा वापर दोन लाईट एक फॅन एक टीव्ही असा वापर कमी प्रमाणात असतांना आलेले विजेचे बिल हे इलेक्ट्रिक बोर्ड यांनी मनमानी प्रमाणात दिलेले आहे इलेक्ट्रिक बोर्ड हे गोरगरीब व सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ खेळून पैसा गोळा करीत आहेत.या कडे अकोला पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अस्या गरीब कुटुंबाला दिलेले मनमानी विजेचे बिल तोरीत कमी करून द्यावे नाहीतर आम्ही कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या कार्यालय समोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. व काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधीकारी जबाबदार राहतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी आकोट शहर पदाधिकारी यांनी निवेदनातुन देण्यात आला या वेळी रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट.सुभाष तेलगोटे माजी शहर अध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष भारीप लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट नितीन तेलगोटे सुखदेव तेलगोटे रामेश्वर दाभाडे सुरेश तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे नवनीत तेलगोटे संदिप पोटे राजु भोंडे उपस्थित होते.
Users Today : 15