सिल्लोडमधे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; गोपीचंद जाधव (जि.प.सदस्य)

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचाच वरचष्मा असल्याचे सिद्ध झाले आहे. १८ पैकी १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाने भगवा फडकवला. तर भाजपाला ५ जागांवर समाधान मानावे लागले. सिल्लोड तालुक्यातील १८ गावांच्या ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी विक्रमी राहिली. निवडून आलेल्या उमेदवार व समर्थकांनी मनसोक्तपणे गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत घोषणाबाजी करून विजयोत्सव करण्यात साजरा आला.अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.या निवडणुकीत १८ गावात बाळासाहेबांची शिवसेना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची होती.अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांचा दोन्ही पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवला. त्यामुळे दावेदारांचे गणित बिघडले आहे. निकालानंतर कृषिमंत्री सत्तार यांच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. निवडणुकीत १८ पैकी १३ ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कृषिमंत्री सत्तार यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, केशवराव तायडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर दुर्गाबाई पवार, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, आसिफ बागवान, शेख बबलू, ताठे, धैर्यशील तायडे आदी पदाधिका-यांसह कार्यकत्यांची उपस्थिती.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *