देवेंद्र सिरसाट नागपूर
नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कडून घडली.महाराष्ट्राच्या राजकारणात मा.जयंत पाटील साहेब ह
सुसंस्कृत,अभ्यासू,सयंमी नेते म्हणून ओळखल्या जातात.सत्ताधारी पक्ष सत्तेत असून सुद्धा विधानसभेत आंदोलन करतात. त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब केल्या जाते. ह्या विरोधात जयंत पाटील साहेब ह्यांनी आवाज उठवला, परंतु द्वेषापोटी शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून जयंत पाटील ह्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही केली.
ह्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे माजी सभापति उज्वलाताई बोढारे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रविन जी खाडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आशिष पुंड तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे हिंगणा शहर अध्यक्ष मंगेश झिले
ह्यांच्या नेतृत्वात हिंगणा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
आंदोलन वेळी राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या व जयंत पाटील साहेब ह्यांच्या वर केलेली निलंबनाची कार्यवाही त्वरित रद्द करण्यात यावी ही मागणी देखील केली.आंदोलन वेळी मा. सभापती रूपालीताई खाडे, दीपक वर्मा, महेंद्रसिंग राजपूत,नगरसेवक दादारावजी ईटणकर, सूर्यभानजी शेंडे, अनुप डाखोळे, सोमेश ससाने, सुरेशजी भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भाऊ फलके, उद्देश उमाटे, तुषार गुंडरे, प्रफुल काकडे, मंगेश शेंडे, अजय कठाणे,मंगेश बोबडे, उमेश झिले, जगदीश खुजे, सुमित शेळके,धनुष हुलके,मंगेश झिले , नारायण झिले,सुरेश यादव,उमेश कुबडे,अमोल झिले, अभिजीत चामाटे, अनिकेत चामाटे, स्वप्नील कन्हेरे, योगेश झिले, सौरभ कनेर, मंगेश मंदे, लखन झिले, दीपक युनाते,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.