देवगाव रंगारी येथे जैन समाजबांधवांकडून मूकमोर्चा

KHOZ MASTER
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे झारखंड राज्यातील जैन धर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या श्री सम्मेदशिखरजी या तीर्थक्षेत्राला झारखंड राज्यात सरकारने पर्यटनक्षेत्र घोषित केले. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी दि.२१/१२/२२ बुधवारी रोजी येथील सकल जैन समाजबांधवांच्या वतीने आपापली दुकाने बंद ठेवून मूकमोर्चा काढून पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की झारखंड राज्यातील गिरिडह जिल्ह्यातील श्री सम्मेदशिखरजी हे तीर्थक्षेत्र हजारो वर्षांपासून जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान व पवित्र स्थळ आहे. हे जैन धर्मीयांचे विसावे तीर्थंकरा यांची मोक्षभूमी आहे. या पवित्र स्थळाला झारखंड राज्यात सरकार व केंद्र शासनाने पर्यटनस्थळ घोषित केले. त्यामुळे या पवित्र स्थळाचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील जैन बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. शासनाने हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी संपूर्ण भारतात जैन धर्मीयांच्या वतीने बंद पाळण्यात आला आहे.देवगाव रंगारी येथे बंद पाळण्यात आला. सकाळी येथील १००८ श्री आदिनाथ जैन मंदिरापासून पोलिस ठाण्यापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांना समाजबांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अजित पापडीवाल, अनिल ठोळे, फंदूलाल ठोळे, सुधाकर अंबेकर, पारस पांडे, सुशील गंगवाल, महावीर पांडे, संतोष गंगवाल, भारत सोनटक्के, अतुल ठोळे, शीतल गंगवाल, महावीर गंगवाल, युवराज बागरेचा, मनोज बाफना, धनेंद्र पांडे, सुधाकर वायकोस, मधुकर वायकोस, नेमीनाथ क्षीरसागर, प्रकाश वायकोस, डॉ. जयचंद कासलीवाल, नितीन पापडीवाल, हेमंत पांडे, धीरज ठोळे, सुयोग पांडे आदींसह जैन बांधवांची उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *