औरंगाबाद प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषीमंत्री मा.नामदार अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन डोळ्याचे पारणे फेडणारा राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव-2023 यंदा सिल्लोड शहरात होत असून यांसाठी शासनस्तरांवर जंगी तयारी सुरु आहे. कृषी, कला व यांसोबतच क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून दि.01जानेवारी ते 10 जानेवारी भरगच्च कार्यक्रम घेतले जाणार आहे. या महोत्सवात देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावणार असून, राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रथमच राज्यांतील मोठमोठी असणारे चारही कृषी विद्यापीठाची याठिकाणी विशेष उपस्थिती असणार आहे. महोत्सवात कृषी प्रदर्शनाचे एकूण 700 स्टॉल लागणार आहेत व सुमारे 2 लाखांच्या वर राज्यभरांतून नागरीक उपस्थित होणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
याच अनुषंगाने कृषी महोत्सवाचे नियोजन कसे असावे, नागरिकांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये यासंदर्भात सिल्लोड येथील सेना भवन येथे नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या आढावा बैठकीत शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते व मंत्री अब्दुल सत्तार यांचे निकटवर्तीय असणारे संदीप मानकर यांनी कृषी महोत्सवाच्या माध्यमांतून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून उपस्थित झालेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींना उपयुक्त मार्गदर्शन करतांना सांगितले की, सदरील साजरा होणारा कृषी महोत्सव सुवर्णमहोत्सव कशा पद्धतीने साजरा होईल व या महोत्सवाची नोंद देशाच्या पातळीवर कशी होईल यांवर प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कर्तव्यदक्ष कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, जि.प.उपाध्यक्ष केशवराव पा.तायडे, औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कृ.उ.बा.समितीचे सभापती अर्जुन पा.गाढे, उपनगराध्यक्ष तथा नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन अब्दुल समीर, ज्येष्ठ नेते अशोक सूर्यवंशी, डॉ.मश्चिंद्र पाखरे, नॅशनल सूतगिरणी संचालक अब्दुल आमेर, जि.प.सदस्य दामू अण्णा गव्हाणे, दत्ता.पा. कुडके, मारोती पा.वराडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, महिला आघाडीच्या दुर्गाताई पवार, मेघा शाह आदींसहित ज्येष्ठ नेतेगण व मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
