कृषी विभागामार्फत मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण विषयी जनजागृती

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यात मागील एक दोन वर्षात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत हॉटस्पॉट व्हिलेज नांदगाव, किन्ही येथे तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मका पिकाच्या लागवडी पूर्वीच मका बियाण्यावरील बीजप्रक्रिया केल्याने होणारे फायदे, मका पिकाच्या वाढ अवस्थेनुसार खत व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन , कीड व रोग व्यवस्थापन तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यास इमामेक्टीन 8 ते 10 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी अशी माहिती कृषि सहाय्यक सतीश बोरसे यांनी दिली तसेच शेतकऱ्यांना मका बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.सदरील प्रात्यक्षिक कार्यक्रमास गावाचे सरपंच ,उपसरपंच तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *